सोमवार, २० फेब्रुवारी, २०१२

श्री पुष्पदंत रचित " महिम्न स्तोत्रं "

निवेदन :-----
मी कोणी  संस्कृत पंडित नाही पण लहानपणा पासून ह्या श्लोकाचे बरीच पारायणे केली पण त्याचा  अर्थ  नसमजता.  श्री दत्तात्रय गोविंद पाध्ये ह्यांनी १९४० साली  लिहलेल्या " Mahimna - Stotra Of Pushpadantaa " ह्या पुस्तकातून  संग्रहित करून आपणां समक्ष ठेवत आहे. सर्व श्लोकांचे अर्थ समजावून घेण्याचा  प्रयत्न करतो आहे बस इतकेच.  क्रमशः सर्व श्लोकाचे अर्थ देण्याचा प्रयत्न करीन.
 --------------------------------------------------------------------------------




त्रयी साख्य योग: पशुपति मत वैष्णवमिती / प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमद: पथ्यमिति च /रुचीनां वैचीत्र्याद्र्जुकूटीलनानापथजुषा / नृणामेको गम्यस्त्वमसी पयसामर्णव इव //

अर्थ:--- 

 हें देवाधी देवा,तिन्ही वेद ,संख्या शास्त्र ,योग शास्त्र,शिव महात्म्य, विष्णू महात्म्य यांत मोक्ष प्राप्ती साठी निरनिराळे मार्ग सांगितले आहेत.


भिन्न रुची उत्पन्न करणारे  "हा मार्ग चांगला " कां " तो मार्ग चांगला " असा प्रश्न्न पडतो. पण हें देवा जो कोणी  सरळ मार्गाने म्हणजे वेदांत श्रवण,नित्य मनन तुज भाजतात त्यानां तुझा साक्षात्कार लवकर होतो. जें लोक वक्र ( कर्म )  मार्गाने भाजतात त्यांना तुम्ही कालांतराने साक्षात्कार देतां.


ज्याप्रमाणे एखादी नदी सरळ  वाहत जाऊन सागरास मिसळते तर दुसरी नदी काहीं वक्र मार्गाने वाहत जाऊन मिसळते.त्याच प्रमाणे काहीं लोक वेद श्रवण ,मनन करून भक्ती करतात व काहीं लोक कर्म मार्गाचे अवलंब करून तुमची भक्ती करतात,शेवटी त्यां दोघानाही आपले दर्शन होतेच.

श्लोका च्या सुरवातीस " त्रयी " शब्द रचिता पुष्पदंत यांनी वापरला तो तीन वेदा करिता. हें तीन वेद म्हणजे ऋग्वेद ,सामवेद, यजुर्वेद हें होत. ऋग्वेदात गायत्री,उष्णिक या सारख्या  छदांनी युक्त  असे श्लोक आहेत. तर सामवेदात ऋग्वेदातील ऋचा गानबद्ध केलेले आहेत. यजुर्वेदात दोन्ही वेदाच्या पेक्षा  निराळे आहे यात संबोनार्थ वाक्ये रचलेली आहेत. 
या  तीन वेदाचे चार वेद, सहा वेदांगे, चार उपांगे, चार उपवेद, असे ऐकून अठरा भाग वेद व्यासांनी  केले ते येणे प्रमाणे ह्या श्लोकांत दिसतील.


तत्र ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोsथर्ववेद इति वेदाः चत्वार: /

कल्पो व्याकरणं निरुक्त छदो ज्योतिषमीति वेदागानि षट् /


पुराणानि न्यायो मिमासा धर्मशात्राणि चेति चत्वार्यु पागानि /


अत्रोपुरानाणमपि पुराणे-षयन्तभार्वः /


आयुर्वेदो धनुर्वेदो गान्धर्ववेदोsर्थ शाश्त्र चेति चत्वार उपवेदाः //  





 श्लोकाचा सारांश -------------
चार वेद:--

 १- ऋग्वेद  २- यजुर्वेद  ३- सामवेद  ४- अथर्ववेद ।

चार वेदान्गे:--


१- शिक्षा  २- कल्प  ३- व्याकरण,  ४- निरुक्त   ५- छन्दस   ६- ज्योतिष

 आठरा पुराणे:---


१- ब्रम्हपुराण  २- पद्म पुराण  ,३-विष्णु पुराण  ४-शिव पुराण  ५- भगवत 

 ६-नारद पुराण  ७-मार्कण्डेय पुराण  ८- अग्न्नि पुराण  ९- भविष् पुराण  

१०- ब्रम्हवैवर्त पुराण  ११- लिङ्ग पुराण  १२-वराह पुराण
१३- स्कन्द पुराण  १४- वामन पुराण  १५- कुर्म पुराण  १६- मत्स्य पुराण 

 १७- गरुड पुराण  १८- ब्रह्माड पुराण


मिमासा ---  


१- पूर्व मीमासा    २-उत्तर मीमासा

धर्मशास्त्र ----


ह्यात् मनु व याज्ञवल्क्य यांनी केलेले वर्णाश्रम धर्माचे नियम आहेत. पुराण,न्याय ,मीमांसा व स्मृती ह्याचे  उपांगे होत.
उपवेदा ----


ह्यांत आयुर्वेद, धनुर्वेद , गंधर्ववेद व अर्थशाश्त्र असे चार आहेत.  आतां आपण पाहणार आहोत ते ह्या चार उपवेदाची व्याप्ती व अर्थ
१) आयुर्वेद ---- 


 आयुर्वेदावर बरीच पुस्तके उपलब्द्ध आहेत.ब्रम्हा, प्रजापती, धन्वंतरी, इंद्र, विष्णु, भारद्वाज आणि अत्री ह्यांच्या उपदेशानुसार अग्निवेश तंत्राचे चरक व द्दढबल यांनी लिहिलेली " चरक संहिता " हा ग्रंथ उपलब्द्ध आहे. यांत सूत्र, शरीर, ऐन्द्रिय,चिकित्सा, निदान, कल्प,आणि सिद्धी  विस्ताराने वर्णिला आहे. 


२) धनुर्वेद ----


हा ग्रंथ ऋषी विश्वामित्र यांनी रचिला व यांत दिक्षा  ( धनुर्लाक्षण ,अधिकारी लक्षण ),  संग्रह ( सर्व शाश्त्रांचा आभ्यास ),सिद्धी ( गुरु कडून मिळालेली शास्त्र विद्या मंत्राद्वारे द्दढीकारण कसे करावे  हें सांगितले आहे ), योग ( द्दढसिद्धीने ,अभ्यासाने, देवता मंत्राने  शाश्त्रांचा प्रयोग करून कसा अनुभव  घ्यावा  हें वर्णिले आहे. )    


३) गांधर्ववेद ----


 हा ग्रंथ भरताने " नाटयशास्त्र " नावाने रचिला. यांत नृत्य, गीत, वाद्य शिवाय चौसष्ठ कला विस्ताराने वर्णिल्या आहेत.


श्री वात्स्यांयन मुनींनी सर्व साधारण लोकांना कळावा म्हणून श्लोका द्वारे कामसुत्रांत वर्णिले आहे.
 सांख्य: ( सांख्याशाश्त्र ) ---


 हा ग्रंथ कपिल ऋषींनी लिहिला यांत जड ,वैराग्य, कथा, परपक्षनिर्जय व अर्थ संक्षेप केला आहे. 
योग: ( योगशाश्त्र ) ---


 श्री पतंजली मुनींनी हा ग्रंथ लिहिला आहे. यांत चित्त निवृत्ती व समाधी वैराग्य सांगितले आहे. चंचल मनाला स्थिर करण्यासाठी यां, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी कशी  लावावी याचे वर्णन केले आहे. योगाचे भेद, कैवल्य याचे विस्तार  पूर्वक विवेचन केले.
पशुपतिमतं: ----


 ह्यांत पाच अध्याय आहेत व पाच पंथ ( पाशुपत, नाकुलीश्पात, कापालिक, गोरक्षनाथीय, रसेस्वर )पहिला अध्यायांत जीव हाच पशु मानला आहे. दुसर्यात हा जीव पशुपती ( शंकर )आहे. तिसरा अध्याय शंकराठ्या ठाई मन एकाग्र ठेवणे  म्हणजे योग असे सांगितले. चवथ्यात विधी म्हणजे अंगास भस्म लावणे  व त्रिपुंड काढणे या विशी सांगितले आहे. पाचाव्यांत मोक्ष प्राप्ती बद्दल  विवेचन केले आहे. 
वैष्णव:----  


हा ग्रंथ नारदांनी रचिला आहे आणि यांत मन, वाणी, व शरीर ह्यांनी सासुदेवाचे आराधना करून मोक्ष कसा प्राप्त करावा हें सांगितले.
प्रस्थान:----


पृथ्वि, आप तेज, वायू  ह्यांपासुन जग उत्पन्न झाले व हें ब्रम्हांडा पर्यंत कण, कण मिळून झालेले आहे असे प्रतिपादित केले आहे.  


 आपण पहिले कि एका ऋचा ( श्लोक ) मध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ह्यांचा सखोल आभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि त्या काळातील ऋषी मुनि प्रत्येक विषयाचा  किती साकल्याने  विचार  करीत  होतें. महिम्न्नात ऐकून ४३ श्लोक आहेत ह्याचे राचीयाता   कवी  पुष्पदंत हें गंधर्व राज कुसुमदशन  असे नाव होतें. त्यांनी आपल्या श्लोकांत असे म्हंटले कि मी शिवाच्या रोषामुळेच भ्रष्ट झालो व त्यांच्याच  कृपा प्रसादाने पूर्वपदास आलो. 



-------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: